
दैनिक चालू वार्ता
उपसंपादक धाराशिव
धाराशिव/भुम (ईट): येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते दासराव हुंबे, जिल्हा परिषद माजी सदस्य राजाभाऊ हुंबे, हनुमंत हुंबे, गवळी सर आणि शंभुराजे देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.या नेत्यांनी मंत्री सावंत यांच्या विकासकार्याने प्रेरित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रवेशामुळे भुम तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होणार असून, स्थानिक राजकारणात नवीन दिशा मिळणार आहे.यावेळी शिवसेना जेष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख, शिवाजी अण्णा भोईटे, युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, युवासेना भूम तालुकाप्रमुख निलेश चव्हाण, रामराजे सातपुते, प्रमोद देशपांडे व शिवसैनिक उपस्थित होते.शिवसेना पक्षाच्या वतीने सर्व नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.