
दैनिक चालू वार्ता
उपसंपादक धाराशिव
धाराशिव:-शिवसेनेने (शिंदे गट)४५ उमेदवार यांची पहिली यादी जाहीर केली असुन त्यात धाराशिव जिल्ह्यातील २४३ परंडा भुम वाशी मतदार संघातुन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.२०१९ च्या निवडणुकीत प्रा.डॉ.सावंत यांनी पहिल्यांदाच धाराशिवच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक १,०६,६७४ मते घेऊन,३२,९०२ विक्रमी मतांनी विजयी झाले होते.