
वाशिम/रिसोड
भागवत घुगे
रणधुमाळी
राजकीय मंडळींच्या हालचालींना आला वेग; उत्सुकता पोहचली शिगेला
………..
रिसोड. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यापासून प्रत्येक गावात निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याचवेळी राजकारणातील सर्वात मोठा सण मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भावी आमदार कोण होणार याबाबत गावागावातील पारावर चर्चा रंगू लागल्या आहेत. दिवसभराची शेतीची कामे आटोपल्यानंतर लोकांमध्ये निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुका आल्या की, राजकीय वातावरण आपोआपच गरमायला लागते. आजवर एकजूट असलेल्या राजकीय पक्षांच्या अधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये फूट पडली
उमेदवाराबाबत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
प्रामुख्याने मतदारांमध्ये विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार व महिलांना रोजगार देणाऱ्या विविध योजना व प्रकल्पांसह पिण्याच्या पाण्याची योजना, दर्जेदार रस्ते, शेतकऱ्यांसाठी पांदण
रस्ते, स्मशानभूमी, पर्यटन स्थळांचा विकास आदींबाबत नागरिक आग्रही आहेत. लोकप्रतिनिधी कडून मतदानासाठी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय भावनिक मुद्द्यांवरही
मतदारांची दिशाभूल केली जात आहे.
आहे. नेत्यापेक्षा अधिक जोश त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आपापल्या नेत्यांसाठी आमदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी दिसून येत आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या 3 जागा आहेत. सध्या काँग्रेसचा एक, भाजपचे दोन आमदार आहेत. रिसोड मालेगाव मतदार संघात महायुती कडून शिवसेना शिंदेगट, राष्ट्रवादी अजित
पवार गट व भाजपकडून उमेदवार
मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, तर आघाडीकडून जवळपास काँग्रेसचा उमेदवार निश्चित असल्यागत आहे. जिल्ह्यात इतर मतदार संघात युती व आघाडीतील अनेक दावेदारांची नावे पुढे येत आहेत. लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. भाजपचा उमेदवार कोण असेल याची चर्चा जोरात सुरू आहे. या प्रमुख पक्षांव्यतिरिक्त इतर इच्छुकही निवडणूक लढवण्यासाठी जनसंपर्क वाढवण्यात गुंतले
आहेत. जनसंपर्क वाढविण्यासाठी विविध उपक्रम विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. अशा स्थितीत उमेदवारांच्या आशा अजूनही कायम आहेत. निवडणुकीपूर्वी जनसंपर्क वाढविण्यासाठी ते गावागावात छोट्या- मोठ्या कार्यक्रमात सहभागी होत असताना, कार्यक्रमाचे आयोजकही या संधीचा फायदा घेताना दिसत आहेत.