
पुणे:खेड तालुक्यात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात सामना होत आहे. मागील पाच निवडणूक पहिल्या आहेत, मी विरूद्ध सर्व असा आहे.
माझ्या समोर फक्त शिवसेनेचा उमेदवार येईल, असे चित्र आहे.
यावेळी उमेदवारी कोणाला जाते हे माहिती नाही; मात्र माझी लढत ही शिवसेना उमेदवाराशी होणार असल्याची शक्यता आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.
दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले की, सोमवारी (दि. 28)श्री भीमाशंकरचे दर्शन घेतल्यानंतर खेड कृषी उपन्न बाजार समितीच्या मैदानात सभा घेणार आहे.
त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे प्रांतकार्यालयाकडे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार यासाठी शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही मात्र माझे कार्यकर्ते आणि चाहते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
आमदार मोहिते म्हणाले की, खेड तालुक्यात राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचे अस्तित्व आहे इतर पक्षाचे तालुक्यात अस्तित्व नाही. तालुक्याची रचना, लोकांची भावना आहे ती एक नंबरला राष्ट्रवादी अजित पवार पक्ष अशी आहे.
दुसरा पक्ष तो शिवसेना आहे. एखादा नेता दुसरीकडे गेला म्हणजे तो पक्ष मोठा झाला हे अजिबात होत नाही अजून निवडणूक होणार आहे लोक त्यांना मान्यता देईल मग कळेल कोणता पक्ष मोठा आहे. आज आमच्या दृष्टीने आमच्यासमोर शिवसेनेचे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.
भावनिक लाट संपुष्टात
लोकसभेला मतमतांतरं झाले पक्षांतर झाले होते. केंद्रात स्थिर सरकार आले आहे. भावनिक लाट संपुष्टात आली आहे. मोदी आणि शेतकरी संदर्भात काही मतभेद लोकसभेच्या निवडणुकीत होते त्यामुळे ते त्यावेळी होते भावनिक लाट त्यावेळी होती आता नाही, असे आमदार मोहिते यांनी सष्ट केले.
विकासकामांवर विश्वास…
माझा विकास कामावर विश्वास आहे. विरोधकांना टीकेचे तालुक्यातील विकासकामे हेच एकमेव उत्तर आहे. गावागावांत जाऊन मी काय काम केले हे दाखवतो. जीवनावश्यक सेवा, रस्ते, पाणी, वीज या सुविधा पोहोचवल्या आहेत.
तालुक्यात वाड्यावस्त्यांवर काम केले आहे. त्यामुळे मी विकासाला महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे. माझ्या मागे जनता आहे. विकासकामावर मी निवडून येईल, असा विश्वास आमदार मोहिते यांनी व्यक्त केला.