
पुणे:आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपाबरोबर गेलो. भाजपचा अनुभव अत्यंत वाईट आम्हाला आला आहे म्हणून याठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे की, शरद पवार हे आमचे दैवत आहे.
आम्ही शरद पवार यांची साथ सोडली, ही आमची फार मोठी चूक झालेली आहे, अशी कबुली दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली. आम्ही शरद पवार यांची जाहीर माफी मागतो.
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार जे काही निर्णय घेतील, त्या निर्णयाबरोबर राहण्याचा माझ्यासह कार्यकर्त्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. आमची मोठी चूक झाली आहे. आम्हाला त्याबद्दल शरद पवार यांनी माफ करावे, अशा विनंती यावेळी थोरात यांनी केली.
चौफुला येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. थोरात म्हणाले की, मी कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर राहणार नाही. शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असेल. पुढच्या काळात भक्कमपणाने कायमस्वरूपी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार आहे.
(दि.२८) पर्यंत तुतारीच्या उमेदवारीबाबत निर्णय होईल. उमेदवारीबाबत शरद पवार यांच्याकडून अजून कसलाही निर्णय दिलेला नाही. सोमवारी (दि.२८) पर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, दौंड तालुक्यातील राजकीय घडामोडीमुळे उमेदवारी देण्यास विलंब होत असल्याचे यावेळी रमेश थोरात यांनी सांगितले. रमेश थोरात यांनी तुतारी चिन्ह मिळावे, यासाठी पक्षश्रेष्ठीसोबत चार बैठका केल्या आहेत, असे असून देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात अजून तरी प्रवेश केलेला नाही.
तालुक्यातील अनेकजण शरद पवार गटांकडून इच्छुक आहेत. सर्व्हेमध्ये जे नाव आघाडीवर असेल त्यांनाच उमेदवारी मिळेल. अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एबी फॉर्म न मिळाल्यास जनतेचा कौल घेऊन पुढे निर्णय घेतला जाईल,असे देखील रमेश थोरात यांनी सांगितले…