
सेलू : जिंतूर-सेलू मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. उर्वरित विकास कामांचा प्रश्न प्रामाणिकपणे पूर्ण करणाऱ्यांच्या पाठी मागे खंबीरपणे उभे राहून साथ द्या. महायुतीच्या उमेदवार आ.मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांना विजय करण्याचे आवाहन आमदार योगेश टिळेकर यांनी केले.
वालूर (ता.सेलू) येथे आमदार मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रचारासाठीच्या सभेत आमदार टिळेकर पुढे बोलताना म्हणाले की, महायुती सरकारने आठरापगड जाती, बारा बलुतेदारांच्या विकास योजना आणल्या. त्यांना न्याय मिळवून दिला. शेतकऱ्यांना मोफत वीज, सौरकृषी पंप योजना देण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतर्गत महिलांना महिन्याला 1500 रूपये बँक खात्यात जमा केले. विराधकांकडे कुठलेच विकासाचे धोरण नाही. म्हणून त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही आ.टिळेकर यांनी यावेळी केले.
महायुती सरकारने विकासांची गंगा आणली. महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतमजूर, कष्टकरी, गवंडी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विविध योजना पोहोचविल्या. सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत सरकारने प्रयत्न केले आहेत. असे आमदार मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
यावेळी रविंद्र डासाळकर, अभय लहाने, विलास सोनवणे, भागवत दळवे, शिवहारी शेवाळे, रावसाहेब बुरेवार, चंद्रकांत चौधरी, अर्जुन बोरूळ, सय्यद जलाल, भगवान खपले, वाहेद पठाण, बाजीराव बोडखे, अझहर पठाण, बंडू आरे, कृष्णा मगर उपस्थित होते.
फोटो : महायुतीचा उमेदवार आमदार मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या आयोजित प्रचारार्थ दरम्यान आमदार योगेश टिळेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उमेदवार आ.मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्यासह उपस्थित कार्यकर्ते.