
सध्या बॉक्स ऑफिसवर एक चित्रपट कल्ला करत आहे, तो म्हणजे, कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 3’. कार्तिकनं साकारलेल्या रुह बाबानं सर्वांनाच भूरळ घातली आहे, एवढी की, काल रिलीज झालेल्या कंगुवालाही ‘भूल भुलैया 3’नं पछाडलं आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर अजय देवगणच्या सिंघम अगेनसह चित्रपटगृहात धडकलेल्या भूल भूलैया 3 चा परफॉर्मन्स अप्रतिम आहे. कार्तिकच्या भूल भूलैया 3 नं ‘सिंघम अगेन’ला डरकाळी फोडूच दिली नाही.
आता सूर्या आणि बॉबी देओलच्या ‘कांगुवा’च्या रिलीजचा भूल भूलैया 3 वर परिणाम होईल, असं वाटलं होतं, पण, या चित्रपटावर कोणताही परिणाम झालेला नाही. ‘भूल भुलैया 3’ बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. एवढंच काय तर, बॉक्स ऑफिसवर मोठा गल्लाही जमवला आहे. ‘भूल भुलैया 3’ नं रिलीजच्या 14 व्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या गुरुवारी किती कलेक्शन केलं? जाणून घेऊयात सविस्तर…
‘भूल भुलैया 3’ नं चौदाव्या दिवशी कितीची कमाई केली?
‘भूल भुलैया 3’ नं थिएटरमध्ये धूम ठोकून दोन आठवडे पूर्ण केले आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यनशिवाय विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. स्टारकास्टचा अभिनय आणि कॉमेडी आणि हॉररचा मिलाफ असलेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि यासोबतच 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटानं केवळ खर्चच वसूल केला नाही तर आता नफाही कमावला आहे.
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाले तर, ‘भूल भुलैया 3’ नं पहिल्यांदा 35.5 कोटी रुपये कमावले होते, त्यानंतर पहिल्या आठवड्याचं कलेक्शन 158.25 कोटी रुपये होतं. दुसऱ्या शुक्रवारी 9.25 कोटी रुपये, दुसऱ्या शनिवारी 15.5 कोटी रुपये, दुसऱ्या रविवारी 16 कोटी रुपये, दुसऱ्या सोमवारी 5 कोटी रुपये, दुसऱ्या मंगळवारी 4.25 कोटी रुपये आणि दुसऱ्या बुधवारी 3.85 कोटी रुपयांची कमाई केली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच, 14व्या दिवशीच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘भूल भुलैया 3’नं रिलीजच्या चौदाव्या दिवशी 4 कोटींची कमाई केली आहे.
यासोबतच ‘भूल भुलैया 3’चे 14 दिवसांत एकूण कलेक्शन आतापर्यंत 216.10 कोटी रुपयांचं झालं आहे.
250 कोटींच्या क्लबपासून फक्त काही पावलं दूर…
‘भूल भुलैया 3’नं बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. सर्वात आधी सिंघम अगेन आणि कंगुवाच्या पुढेही रुह बाबाची भिती कायम आहे. ‘भूल भुलैया 3’ बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवत आहे. रिलीजच्या 14 दिवसांत ‘भूल भुलैया 3’ 216 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता लवकरच ‘भूल भुलैया 3’ 205 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. तसेच, येत्या तिसऱ्या विकेंडला ‘भूल भुलैया 3’च्या कमाईत वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. असं झालं तर ‘भूल भुलैया 3’ लवकरच 205 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं सांगितलं जात आहे.