
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान संभाव्य हवाई हल्ल्याच्या धोका लक्षात घेऊन अमेरिकेने कीव्ह येथील दुतावास बंद केले आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह येथील अमेरिकेच्या दूतावासाला बुधवारी संभाव्य हवाई हल्ल्याबाबत माहिती मिळाली.
यामुळे दुतावास बंद केले जाईल, असे अमेरिकेच्या स्टेट कॉन्सुलर अफेयर्स विभागाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.