
धाराशिव (उस्मानाबाद) :केसर जवळगा हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातला कर्नाटक सीमा भागालगत वसलेला शेवटचा टोकाचं गाव या गावांमध्ये प्रामुख्याने अनेक समाजाचे लोक सदभावनेने सर्व धर्म समभाव जपून गावाच्या पुनर्वसनापासून ते आज तागायत गुण्यागोविंदाने आनंदमय जीवन जगत आहेत.याच गावामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे महात्मा गांधी विद्यामंदिर या इतिहासकालीन शाळेने आज पर्यंत गावातील असंख्य तरुण विद्यार्थी घडवले आहेत.आज ते तरुण युवक आपल्या मंगलमय जिवनात यशस्वी रितीने देश सेवेमध्ये जनसेवेमध्ये गाव सेवेमध्ये विविध स्तरावर राहून अनेक मोठ मोठ्या शासकीय पदावर राहून माजी विद्यार्थी देश प्रति जनसेवा करत आहेत.केसर जवळगा या गावाचा एकंदरीत आतापर्यंतचा लोकसंख्या अनुषंगाने युवकांचे कार्याचे आलेख पाहता येथील अनेक भौतेक समाजातील तरुण युवक देश सेवेमध्ये मोठ्या प्रमाणावर सेवेत आहेत.तर काही प्रमाणात शासकीय पदावर काही शिक्षक म्हणून तर काही वकील म्हणून तर काही ड्रायव्हर चालक मालक यशस्वी शेतकरी यशस्वी उद्योजक तर काही पत्रकार सक्रिय समाजसेवक म्हणून गावाचं नाव राज्यपातळीवर देश पातळीवर गाजवत आहेत.ते चांगल्या समाजासाठी एक वैभवशाली उपक्रम राबवून गावाचं नाव आपल्या शाळेचे नाव आपल्या आई-वडिलांचे नाव – नाव रूपाला आणण्यासाठी एक मोठं वैचारिक लढा देऊन इतिहास रचनेमध्ये गावचे तरुण कधीही मागे राहत नाहीत.ही या गावची खासियत व आन-बान शान आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर येथे शिक्षण घेणारी सन 1999 व 2000 या कालखंडा नंतर ची ही यशस्वी जीवनाची वाटचाल करणार्या विद्यार्थ्यांची बॅच म्हणजे ती आमचीच बॅच होय शाळेचे नाव शिक्षकांचे नाव गावचं नाव आई वडील यांचे नाव राज्यपातळीवर देशपातळीवर गाजवून गावाला व शाळेला एक बहुमत्व मानसन्मान देऊन मानेचा सन्मानेचा तुरा या शाळेच्या मुखुटात रवणारी हीच ती बॅच म्हणून आजही विद्यालयात व गावात जिल्ह्यात ओळखली जाते याच अनुषंगाने आमच्या दहावीच्या बॅचमधील काही गावात वास्तव्याला असणारे विद्यार्थी उद्योजक व शिक्षक तर कर्मचारी यांनी एक आगळावेगळा विचार एक वैभव मनात धरून आपल्या या बॅचला एका मंचावर एका व्यासपीठावर पुन्हा येता व आणता येईल का गेट टुगेदरचा अनुभव घेतला येईल का व मागील दहावीच्या आठवणी पुन्हा त्यांना नवीन उजाळा देता येईल का या दूरदृष्टी तून एक आराखडा तयार केला त्या आराखड्यानुसार त्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना याची कल्पना देण्यात आली व सर्वांनी या संमेलनाला होकार दिला.चार पाच महिन्या पासून चलत असलेल्या या विचारांचा व दर रोज या विषयावर होत असलेल्या खलबत्त्यांना कुठे तरीही आता किनारा मिळाले असे म्हटले तर ते काही वावगे ठरणार नाही आणि हाच तो ऐतिहासिक क्षन दि. 24/2024 रोजी वार रविवारी महिना नोव्हेंबर या दिवशी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपल्याला एक भेट मित्राची स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून अनुभवायचे आहे.असे ठरले व ते सर्व वर्ग मित्रांना विश्वासात घेऊन घोषित करण्यात आले हा कार्यक्रम एक रम्यमय अशा वातावरणामध्ये निसर्गरम्य सानिध्यात आठवणीच्या झोकात भेटण्याच्या महापुरामध्ये अश्रूच्या धुक्यामध्ये हळव्या हळव्या मनामध्ये तो एक ऐतिहासिक क्षण व आम्ही सर्व बाल मित्र गाव मित्र वर्ग मित्र म्हणून सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांच्या मौलाच्या वेळ काढून उपस्थित राहण्याच्या या अद्भुत स्नेहसंमेलनामध्ये पुन्हा एकदा दहावीच्या नंतर विखरलेली फुलपाखरे त्या फुलांच्या सुगंधाने त्या शाळेच्या बागे मध्ये त्याच पायथ्याशी आली या सर्वांनी येथूनच ही सर्व जण आभाळात उड्डाण भरली होती.ती परत याच घरट्यात तब्बल 22-23 वर्षांनी परत या मुळ प्रांगणात आली ती सर्व विखरलेली पक्षी परत त्या थव्यामध्ये आली हे पाहून मन भहरलं पुन्हा तोच कौवकवाट किलबिल पना तोच आवाज तोच आनंद यानें स्नेहसंमेलन भारावून गेले पुढे आमच्याच सोबतली आमच्या बहिणी म्हणजे या वर्गातील क्लासमेंट मुलीमध्ये कोणी शिक्षक आहे तर कोणी उत्तम गृहणी आहे तर कोणी उत्तम समाजसेविका आहे याहून पुढे कोणी आपलं संसार शून्यातून थाटून एक आगळावेगळा केसर जवळगा पॅटर्न आपल्या सासरी त्यांनी निर्माण केला आहे.अशा आमच्या सर्व क्लासमेंट बहिनी या वेळी आपल्या नवीन जीवनातील जोडीदारासह उपस्थित होत्या आपल्या शाळेतले काही विद्यार्थी आज आपल्यामध्ये नाही आहेत तसेच आपल्याच शाळे मधले आपले शिक्षक गुरुवर्य आपल्याला सोडून देवा घरी गेले आहेत.या सर्वांच्या आठवणी मध्ये श्रद्धांजली वाहताना जो भाव आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये होता डोळे पानावले होते अनेक विद्यार्थी हसत हसत रडत होते तो काळ तो वेळ 22 वर्षांनी अनुभवला सर्वांना दोन मिनिटांमध्ये आनंददायी अश्रू मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली मन स्तब्ध होते सुन्न होते पुढे कार्यक्रमाची रूप रेषा ठरली होती कार्यक्रम सुरू झाला संमेलनामध्ये सर्व विद्यार्थी मोठ्या थाटामाटामध्ये फेटे बांधून आपापल्या वेशभूषेमध्ये पण शांत संयमी आदरपूर्व आपापली जागा घेऊन आसनास्त झाले. पुन्हा एकदा एक शिस्त त्या ठिकाणी आढळून आली शाळेच्या प्रांगणामध्ये प्रार्थना झाली संमेलनाच्या सुरुवातीस महापुरुषांचे पुष्प अर्पण व दिप प्रजलन करण्यात आले स्वागत गीत संपन्न झाले बघता बघता सर्व उपस्थित गुरुवर्य यांचे सन्मान सत्कार झाले माजी विद्यार्थ्यांचे मनोगत झाले प्रत्येक विद्यार्थ्याने व वर्गमित्राने आपापल्या परीने आपल्या वर झालेल्या संस्काराचे व शाळेतील आठवणीचे धडे आपल्यासमोर व्यक्त केल्या गुरुजनांना दाखवून दिलं तुमच्या प्रेरणेने तुमच्या शिक्षेने आम्ही आज उभ्या महाराष्ट्रामध्ये या देशांमध्ये या भूमीवर वेगवेगळ्या स्तरांमध्ये राहून जन सेवा देत आहोत काही क्लासमेंट बहीणबाई मुलींमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केले गेलेला काळ आताचा काळ याची परिभाषा उत्तमपणे मांडण्यात आली शिक्षकांचे मार्गदर्शनपर भाषण व्यक्त झालं गावातील अनेक उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार झाला 22 वर्षाच्या प्रदीर्घ अशा कालानंतरही शाळेबद्दल आत्मीयता शिक्षकांबद्दल विनम्रता आत्मीयता गावाबद्दल श्रद्धा आत्मीयता गावांच्या लोकांबद्दल सहानुभूती भेटलेल्या वर्ग मित्रासोबत असलेली मैत्रीता या ठिकाणी सर्व उपस्थित वर्ग मित्रांच्या बाणीतून वागण्यातून समोर आले वेळ थांबत नव्हता मन काही मानत नव्हतं पण काळ चक्र चालत असतो हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात शाळेच्या इतिहासात एक अविस्मरणीय इतिहास घडवून हा पहिला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सन. 1999 – 2000 बॅच च्या विद्यार्थ्यांच्या मोठेपणाचा एक भाग ठरला व आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरला आहे असं म्हणलं तर ते काही आश्चर्यकारक ठरणार नाही… या संमेलनाचे सर्व श्रेय व शोभा जर कोणी वाढवली असेल तर शाळेतील आजी बाल विद्यार्थिनी व विद्यार्थी कारण ते अनेक तास एकाच ठिकाणी बसुन कळ सोसत होते.अनेक तास मनाने शरीराने आपल्या या स्नेहसंमेलनाचा अतिशय सुक्ष्म पध्दतीने व या होत असलेल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आनंद ते सर्व जन समोर बसुन घेत होते व काही विद्यार्थी माजी विद्यार्थी कसे घडले व त्यांनी जीवनात यश कसे संपादन केले या वरती प्रकाश घालत होते आम्ही ते सर्व पाहत होतो अनुभवत होतो त्यांच्या डोळ्यांमध्ये उद्याचा भविष्य बघत होतो म्हणून अंतर मनामध्ये त्यांना पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एक वेळ अशी होती तोच अनुभव त्याच ठिकाणी बसून आम्ही घेतला होता.जोपर्यंत हे विद्या मंदिर आहे.तोपर्यंत या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी तो अनुभव घेणार व जीवनात यशस्वी होणार अशी इच्छा व्यक्त करतो.या संमेलनाच्या ऐतिहासिक क्षणाला साक्ष म्हणून आम्हांस सर्वाना लाभलेले प्रमुख पाहुणे होऊन शेवट पर्यंत उपस्थित राहुन का संमेलनाला खरे स्वरूप व बळकटी ज्याचा मुळे वाढली असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डि.एस.कुलकर्णी सर व आजचे विद्यालयाचे ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.सोबत मचांवर प्रमुख उपस्थित आमचे सर्व शिक्षक या संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत भुरे सर,जयपालसिंग राजपूत सर,सगट सर, संजय कांबळे सर,प्रमोद बादोलो सर, घोडके सर, भाले सर,देवकर सर,वैजीनाथ भंडारकवठे सर,सिध्देश्रवर पाटील सर,कार्कुण भुरे,जेष्ठ सिपाई चणु मुत्या,रमेश कांबळे,काळे,व महिला शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते व वेळोवेळी ते आढाव घेऊन मार्गदर्शन करत होते.तसेच या संमेलनाचे प्रास्ताविक आपलाच वर्गमित्र बालुसिंग राजपूत यांने अतिशय मार्मिक पध्दतीने केलं व सूत्र संचलन आमीर गवंडी यांने आपल्या आतील सर्व कला गुणांचा योग्य तो उपयोग संचलन करते वेळी केलं एक मांईडबोलोईंग शब्द रचना होती तर शेवटी मौल्यवान असे आभार रमेश भुरे यांनी मानले.या अद्भुत चैतन्य पुर्ती स्नेहसंमेलनाला यशस्वी करण्यासाठी आपल्याच प्रशाळेतील विद्यार्थी आपल्या ग्रुपचे ॲडमिन या संमेलनाचे संकल्प प्रमुख अंबादास देवकर,व सतत या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपल्या जीवाचे राण करून आपल्या सर्व मित्राच्यां चेहर्यावर हश्य आणण्यासाठी परध्या मागे राहुन हे संमेलन पार पाडले आमचे सर्वांचे लाडके मित्र रमेश भुरे,मुलींमध्ये सौ.अनिता राजपूत,व त्यांच्या सर्व सोबती मुली,तसेच मुलामध्ये सतीश कोतळीकर,दशरथ गायकवाड ,बंडू बिराजदार,इलाई पटेल,राघवेंद्र पाटील,संदीप सुतार,रवींद्र बिराजदार, सुभाष बिराजदार ,महांतेश्वर शिवमूर्ती,शरणाप्पा गुरव,आसिफ मुल्ला,मुनीर शेख,शिवानंद कलशेट्टी,राजेंद्र पाटील,जावेद पडसालगे ,डॉक्टर समद शेख सदानंद बिराजदार,व माणिक बिराजदार,धनपाल राजपूत,सहीत अन्य उपस्थित सर्व वर्ग मित्रांनी वयैक्तीक काळजी घेत स्वतः मनाने वेगवेगळी जवाबदारी घेऊन या स्नेहसंमेलनाला यशस्वीरित्या संपन्न केले आहे…व शेवटी ही 22 वर्षांनी सुंदर रंगीबेरंगी पणे एकत्रित पणे येऊन भरलेली शाळा त्या वर्गात स्वताला सामाऊन घेऊन विविधतेने व पुन्हा विभिन्न होण्यासाठी आपन आपल्या मार्गाने मारगास्त झालो…चला मित्र हो जीवनाच्या या नियतीला नमंण होऊन आभाळात गवसणी घालून पुन्हा कधी संधी मिळाली तर एकत्रित भेटु पुन्हा एकत्रित भेटु!!जय हिंद!!