
50 वर्षांपासून कपडे घातलेच नाहीत, कारणही अजब
आजवर तुम्ही काही विचित्र माणसं पाहिली असतील. असाच एक विचित्र माणूस सध्या चर्चेत आला आहे. तेलंगणात राहणारी ही व्यक्ती. जिनं गेल्या 50 वर्षांपासून शर्ट-बनियन असे कपडे घातलेच नाहीत.
त्यांनी लग्नही तसंच कपडे न घालता केलं. यानंतर त्याची पत्नीही त्याला सोडून गेली. तरी त्याने कपडे घातलेच नाही. त्याच्या या विचित्र सवयीमागील कारणही अजब आहे.
मुक्कैरा बक्कय्या असं या व्यक्तीचं नाव. 50 वर्षांचा मुक्कैया तेलंगणातील कोरुतला मंडलातील आयलापूर गावात राहतो, त्याला ग्रामस्थ ‘गांधी’ म्हणतात. याचं कारण म्हणजे ज्याप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अनेकदा शर्ट किंवा बनियान घातलं नाही, तसंच मुक्कैरा बक्कय्या देखील गेल्या 50 वर्षांपासून बनियान आणि शर्ट न घालता आहेत.
मुक्कैराचं लग्न झालं तेव्हाही त्यानं आपली सवय सोडली नाही. त्यानं लग्न केलं तेसुद्धा शर्ट किंवा बनियान न घालता. त्याच्या या सवयीमुळे त्याची पत्नीही नाराज झाली. तुला माझ्यासोबत राहायचं तर शर्ट घालावा लागेल, अशी अट तिनं ठेवली. पण मुक्कैरा काही तिचं ऐकला नाही. त्यामुळे संतापून ती त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली.
शर्ट किंवा बनियान न घालण्याचं कारण काय?
त्याने आजपर्यंत कधीही शर्ट किंवा बनियान का घातलं नाही, या सवयीमागील कारण काय, हेसुद्धा त्यानं सांगितलं.
आपल्या या अनोख्या सवयीमागचे कारण त्यानं सांगितलं. तो म्हणाला, ‘मी लहान होतो तेव्हा आमचं कुटुंब खूप गरीब होतं. माझ्यासाठी शर्ट विकत घेण्यासाठी माझ्या आई-वडिलांकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे माझ्या लहानपणी मी शर्टशिवाय जगत होतो. नंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली. घरच्यांनी मला अनेकदा सांगितलं की आता परिस्थिती ठीक आहे, तू शर्ट विकत घे आणि घाल. पण मला शर्ट घालायची सवय नव्हती किंवा मला ते कधीच वाटलं नाही. म्हणून मी त्यांचं ऐकलं नाही.
मुक्कैराने पुढे सांगितलं की, ‘माझं लग्न झालं, पण मी तेव्हाही बनियान आणि शर्ट न घालता लग्न केलं. माझ्या पत्नीला हे अजिबात आवडलं नाही. तिने मला शर्ट घालायला सुरुवात करावी असं सांगितलं. पण मी नकार दिला. ती रागावली आणि मला सोडून गेली.
लहानपणी गरजेमुळे जी गोष्ट करावी लागली ती मुक्कैराची सवय बनली. आपल्या सवयीबद्दल बक्कय्या म्हणाला, ‘मला बनियान किंवा शर्ट घालताना अस्वस्थ वाटतं. मला शर्टशिवाय अधिक आरामदायक आणि मोकळं वाटतं. हिवाळा असो किंवा उन्हाळा, मी नेहमी बनियान आणि शर्टशिवाय राहणं पसंत करतो. तो माझ्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. मी तो बदलू शकत नाही’ मी 50 वर्षांपासून हे करत आलो आहे आणि यापुढेही करत राहीन. शर्ट घालणं माझ्या स्वभावाच्या विरोधात आहे.