
दैनिक चालू वार्ता
पुणे प्रतिनिधी शहर धनाजी साठे
पुणे: परभणीतील घटनेत पोलिसांना सह आरोपी करा.
परभणीतील घटनेच्या निषेधार्थ व गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ,
पुण्यातील संविधान समर्थक वकिलांच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
परभणीतील संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या वस्त्यांमध्ये घुसून कॉम्बिग ऑपरेशनच्या कारवाईचा आदेश देणारे पोलीस अधिकारी,
तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येस जबाबदार असणारे पोलीस, यांना सह आरोपी करण्यात यावे तसेच संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सबंध देशवाशियांची माफी मागावी.
इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
याप्रसंगी ॲड. जितेंद्र कांबळे, ॲड.अलीम खान अश्रफी, ॲड. संजय कांबळे ॲड. सालेहा इनामदार,ॲड. विजय शेलार, ॲड. अश्विनी कांबळे, ॲड. महेंद्र कावळे, ॲड. उमेश घडसिंग , ॲड.पल्लवी साबळे ॲड.शंकर रोकडे, ॲड. बापू जंगले, ॲड. नागिन कांबळे,ॲड. अरुण शिंदे,ॲड. गौतम गायकवाड, ॲड. रवी वडमारे, सामाजिक कार्यकर्त्या महानंदाताई डाळिंबे, आकाश कासले, अरविंद कांबळे सह अनेक वकील, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.