25,000 ते 81,000 पगार; अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे कोणती? जाणून घ्या
आर्मी डायरेक्टरेट जनरल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स (DG EME) ने ग्रुप सी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. ही भरती इलेक्ट्रीशियन, फायरमन, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), व्हेईकल मेकॅनिक आणि इतर पदांसाठी आहे.
विविध कार्यस्थळांवर एकूण पदांची संख्या 625 आहे.
अर्जाची अंतीम मुदत किती?
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. ऊमेदवारांना सामान्य पोस्टाने अर्ज युनिटच्या पत्त्यावर पाठवावे लागतील. आर्मी डीजी ईएमई ग्रुप सी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे. निवडलेल्या उमेदवारांना भारतात कुठेही नियुक्त केले जाऊ शकते. उमेदवाराला राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागेल.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता बदलते. जसे की,
1) इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर – 10 वी पास आणि मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र.
2) लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) – 12 वी पास आणि किमान टायपिंग गती (हिंदीमध्ये 30 w/min किंवा इंग्रजीमध्ये 35 w/min).
3) फायरमन – 10 वी पास आणि अग्निशमन उपकरणे वापरण्याचे ज्ञान.
4) ट्रेडसमन मेट आणि मल्टी-टास्किंग स्टाफ – 10 वी पास.
वयोमर्यादा किती असावी?
सर्वसाधारण उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल 25 वर्षे असावे. फायर इंजिन ड्रायव्हर पदासाठी कमाल वय 30 वर्षे आहे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार आरक्षित प्रवर्गांना वयात सवलत मिळेल.
अर्ज शुल्क किती?
सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क विनामूल्य आहे.
उमेदवारांना सामान्य पोस्टाने अर्ज पाठवावे लागतील.
अर्जाची सादर करण्याची तारीख किती आहे?
अर्ज सुरू करण्याची तारीख: 28 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2025
अर्ज कसा करावा?
अधिसूचनेत दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज तयार करा.
सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती संलग्न करा.
सामान्य पोस्टाने अर्ज योग्य पत्त्यावर पाठवा.
लिफाफ्यावर “पोस्टचे नाव” आणि “युनिटचे नाव” वर लिहा.
अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेचे पालन करा.
