
सुनावणीपूर्वीच सरकारी वकिलाने सोडली केस, मोठं कारण आलं समोर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणी केज कोर्टातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. काल रात्री आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad Arrest) यांच्या रिमांडबाबत केज कोर्टात रात्री उशिरा सुनावणी पार पडली.
सीआयडीचं पथक रात्री साडे नऊच्या दरम्यान केजमध्ये दाखल झालं होत. (Santosh Deshmukh Murder Case)
त्यानंतर त्यांची केजच्या शासकीय रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी झाली. तपासणीनंतर त्यांना घेऊन सीआयडी पथक केज पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्याठिकाणी काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर त्यांना केज कोर्टात आणल जाणार होतं. पण त्यापूर्वी केज कोर्टात काही नाट्यमय घडामोडी घडल्या.
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वाल्मिक कराडची बाजू मांडण्यासाठी चक्क एक नाही तर दोन-दोन वकील दाखल झाले. सीआयडीची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील एस. एस. देशपांडे हे दाखल झाले. पण सुनावणीला अवघे काही क्षण सुरु असताना वैयक्तिक कारणास्तव सरकारी वकील एस. एस. देशपांडे यांनी या प्रकरणी अन्य वकील नेमावा असं कोर्टाकडे पत्र दिलं. याप्रकरणी जे. बी. शिंदे सरकारी वकील म्हणून युक्तिवाद केला.
दरम्यान, सुनावणीवेळी जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराड यांना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद केला. तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला आहे.