हिऱ्यासाठी किती रुपये केले खर्च?
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या कुटुंबाला 2023 मध्ये जगभरातील नेत्यांकडून लाखो डॉलर्सच्या भेटवस्तू मिळाल्या, त्यापैकी सर्वात मौल्यवान भेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडन यांच्या पत्नी जिल बायडन यांना दिली होती.
जिल बायडन यांना पंतप्रधान मोदींनी 20 हजार अमेरिकन डॉलर्स (अंदाजे रुपये 17,15,440) चा हिरा भेट म्हणून दिला होता.
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक हिशेबानुसार, मोदींनी दिलेला 7.5 कॅरेटचा हिरा 2023 मध्ये राष्ट्रपतींच्या कुटुंबातील सदस्याला मिळालेली सर्वात महागडी भेट आहे. याशिवाय, बायडन कुटुंबाला 14,063 डॉलर किमतीचा ‘ब्रोच’ आणि 4,510 डॉलर किमतीचे ‘ब्रेसलेट’, युक्रेनच्या राजदूताकडून आणि इजिप्तच्या फर्स्ट लेडीकडून मिळाले
मंत्रालयाच्या माहितीनुसार, मोदींनी भेट दिलेला 20,000 डॉलरचा हिरा व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगमध्ये ठेवण्यात आला आहे. तर राष्ट्रपती आणि फर्स्ट लेडी यांना मिळालेल्या इतर भेटवस्तू संग्रहात पाठवण्यात आल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनाही अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या.
यूएस फेडरल कायद्यानुसार, अधिकाऱ्यांनी परदेशी नेते आणि त्यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू घोषित करणे आवश्यक आहे ज्यांचे अंदाजे मूल्य 480 डॉलरपेक्षा जास्त आहे. अधिक महाग भेटवस्तू सरकारकडे हस्तांतरित केल्या जातात किंवा अधिकृत प्रदर्शनात ठेवल्या जातात.
राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनाही मिळाले गिफ्ट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनाही अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. यामध्ये दक्षिण कोरियाचे सध्या महाभियोग असलेले राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांचा 7,100 डॉलर किमतीचा फोटो अल्बम, मंगोलियन पंतप्रधानांचा 3,495 डॉलर किमतीचा मंगोल योद्धांचा पुतळा, ब्रुनेईच्या सुलतानचा 3,300 डॉलर किमतीचे चांदीचे ताट यांचा समावेश आहे.
