
आतापर्यंत कोणाकोणाला फोन?
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे.
या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या नेत्यांकडून सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप केले जात आहे. आता धनंजय मुंडेंकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींपैकी दोन आरोपी पोलीस कोठडीत आहेत. तर एक जण फरार आहे. तसेच दुसरीकडे खंडणीप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड हा या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असून याप्रकरणी धनंजय मुंडेंनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने सुरु आहे. आता धनंजय मुंडेंकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
धनंजय मुंडेंकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी जोरदार लॉबिंग
धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अजित पवारांची भेट घेत आहेत. त्यातच काल अजित पवारांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडेंनी तडकाफडकी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती. त्यानंत धनंजय मुंडे यांनी ‘मी काही राजीनामा वैगरे दिलेला नाही, मी जर राजीनामा दिला असता तर मी कॅबिनेटच्या मीटिंगला कसा आलो असतो?’ असे स्पष्टीकरण दिले होते. यानंतर आज धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काल धनंजय मुंडेंनी प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती. तर आज धनंजय मुंडेंनी सुनील तटकरेंसोबत फोनवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी सध्या घडत असलेल्या विविध प्रकरणांवर भाष्य केले.
संतोष देशमुखांच्या पत्नीला शासकीय नोकरी
दरम्यान बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर काल संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला मस्साजोग गावापासून जवळ असलेल्या लातूरमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेतला.