
डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड केलं गुपित; पाकिस्तानसोबत…
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अधिकच पेटला. हेच नाही तर भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. दोन्ही देशांकडून मोठी हल्ले केली जात होती. भारत-पाक युद्ध अधिक चिघळताना दिसले.
मात्र, दोन्ही देशातील लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन यातून मार्ग काढला आणि युद्ध थांबले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने दावा करत आहेत की, त्यांनी भारत-पाक युद्ध थांबवले. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकला फोन लावला आणि युद्ध थांबवण्यासाठी धमकी दिली आणि त्यानंतरच हे मोठे युद्ध थांबले. मात्र, भारताने कायमच स्पष्ट केले की, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आम्ही युद्ध थांबवले नाही.
आता नुकत्याच परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध बंदी घडून आणली. एक मोठे युद्ध रोखता आले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीश हे माझ्यासोबत होते. ते पाकिस्तानमधील महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांनी लोकांच्या एका ग्रुपला सांगितले की, या व्यक्तीमुळे लाखो लोकांचे जीव वाचले आहेत.
कारण त्यांनी युद्ध रोखले आहे. कारण ते युद्ध खूप जास्त वाईट होणार होते. पंतप्रधान शहबाज आणि आसिम मुनीश यांचे बोलेणे ऐकून मला खूप जास्त सन्माजनक वाटत होते. मला ते ज्या पद्धतीने बोलत होते ते प्रचंड आवडले. मला त्यांनी जे काही बोलले त्यापैकी सर्वात जास्त आवडले की, त्यांनी म्हटले या व्यक्तीमुळे लाखो जीव वाचले. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, भारत-पाकिस्तान युद्ध इतके पेटले होते की सात विमाने हल्ल्यात पाडण्यात आली.
पाकिस्तानची पाडली की, भारताची हे त्यांनी यावेळी सांगितले नाही. ज्यावेळी हे युद्ध सुरू होते, त्यावेळी मी दोन्ही देशांच्या नेत्यांना फोन करून म्हटले की, तुम्ही असे करू शकत नाहीत. तुम्ही परमाणू संपन्न देश आहात आणि तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात परमाणू आहेत. एका सर्वात मोठ्या युद्धाला मी थांबवले. .यावरून हे स्पष्ट होते की, आसिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान किती जास्त चापलूसी केली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून भारत आणि अमेरिकेतील तणाव अधिकच वाढण्याचे संकेत आहेत.