देहू नगरपंचायत चा निर्णय
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
देहू नगरपंचायत आदेशानुसार देहूगांव नेहमी प्रमाणे आठवडी बाजारात भरतो परंतु दि १४रोजी मकरसंक्रांत दिवशी आठवडी बाजार असल्याने आज बाजार भरु नये असे आवाहन करण्यात आले आहे
महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आळंदी देहू तीर्थक्षेत्रात संत तुकोबारायाचे संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शनासाठी भाविक येतात त्यामुळे मकर संक्रात दिवशी बाजारपेठ भरले की वाहतूक कोंडी होती त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये करिता बाजार बंद ठेवण्यात आला आहे
बाजार दिवशी दुकाने रस्त्याच्या कडेला दुकाने थाटवले जातात त्या दुकानावर बाजार घेण्याकरता नागरिकांची चांगली झुंबड होती त्यामध्येच मुख्य रस्ता असल्याने त्या रस्त्यावरून पीएमपीएल बस रिक्षा खाजगी बस व कामगाराच्या वाहन शालेय बस जाण्यास मोठा कसरत करावी लागते ही बाब लक्षात घेता देहू नगरपंचायत यांच्या आदेशानुसार
दि १३रोजी सायंकाळी ६वाजता संपूर्ण देहूनगरीत लाईस्पिकर लावून बाजार मंगळवारी भरण्यात येऊ नये असे आवाहन केले आहे
नागरिकांना नोंद घ्यावी
