
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवनात आज आयोजित केलेल्या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त मिळाला. यावेळी नागरिकांच्या विविध ४५ तक्रारींचा ऑन दि स्पॉट निपटारा करण्यात आला
जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी मार्गी लागत असल्याने या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. जिल्ह्यातील अनेक शेतकरी, कामगार, व्यावसायिक, महिला, तरुण व अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या.
आमदार शिंदे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रारींचा निपटारा केला. महसूल, आरोग्य विभाग, जलसिंचन, पशुसंवर्धन, महावितरण, जिल्हा परिषदेचे विविध विभाग, धरणग्रस्त, कृषी, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, फायनान्स कंपनी, गिरणी कामगार अशा अनेक विभागातील ४५ तक्रारींचा यावेळी निपटारा केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, संदीप मोझर, अतुल शिंदे, शफीक शेख, विजय बोबडे, डॉ. नितीन सावंत, भारती काळंगे, अर्चना देशमुख, अमोल पाटोळे, सचिन जाधव, बाळासाहेब शिंदे, विजय कुंभार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.