
हंगामी अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा यांची चर्चा
Amit Deshmukh काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी कोल्हापूरचे सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नावाला दिल्लीतील नेतृत्वाने हिरवी झेंडी दाखवली होती. पाटील यांच्याशी दिल्लीतील नेतृत्वाने चर्चाही केली.
मात्र, महाराष्ट्रात संस्थानिक, कारखानदार आणि मोठे उद्योजक असलेल्या काँग्रेस नेत्यांकडून प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनीही नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात हंगामी अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची निवड होऊन त्यांच्या नेतृत्वात नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. यामध्ये अमित देशमुख, सतेज ऊर्फ बंटी पाटील, यशोमती ठाकूर, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे.Amit Deshmukh
येत्या मार्च महिन्यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला असून तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती
राज्यासह केंद्रातील महायुती सरकारमध्ये ज्याप्रकारे विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा विविध संस्थांकडून कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे राज्यासह देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद कारखाने, कंपनी, संस्थानिक असलेल्या काँग्रेस नेत्यांकडून स्वीकारण्यास तयार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.