
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील सातपैकी एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा आणि मकोका दाखल करण्यात यावा, या मागणीसह हत्येतील तपासाच्या संदर्भाने कुटुंबीयांना आवश्यक ती माहिती मिळत नसल्याचा आरोप करून मस्साजोग ग्रामस्थ, संतोष देशमुख यांचे बंधू, मुलीसह कुटुंबीयांनी सोमवारी गावातील पाण्याच्या दोन टाक्यांवर चढून आंदोलन केलं.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचा पोलिसांनी जबाब घेतला आहे. तर खंडणी प्रकरणाततील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्रपरवाना बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकातील नऊ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी नवे सहा अधिकारी नियुक्त करण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात मोठ्या चर्चेचा विषय आहे. यांसह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा.