
कुंटणखाना प्रकरणात झाली होती पत्नीला अटक
एकीकडे वाल्मिक कराड याला मोक्का लागला तर दुसरीकडे राज्याचे वातावरण पेटले. याला कारण आहे त्याचे समर्थक. वाल्मिक कराडला चुकीच्या गुन्ह्यात अटक केली असून त्याची ताबडतोब सुटका करावी, या मागणीसाठी त्याच्या समर्थकांनी कराडला मोक्का (Mokka to Walmik Karad) लावताच 10 मिनिटांत परळी बंद केली.
यामुळे परळीत तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. तर दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. काल त्याला पोलीस कोठडी सुनावताच कोर्टाबाहेर देखील समर्थकांनी गदारोळ घातला. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता.
हे प्रकरण इथंवरच थांबले नाही. तर कराडच्या समर्थनार्थ दोन व्यक्तींनी पेटवून घेतले होते. कराडसाठी जीव देणारे ते दोघे कोण? अशा चर्चांना उधाण आले होते. अशातच आता त्या दोघांची नावे समोर आली असून एकाची माहिती समोर आली आहे. पेटवून घेणाऱ्या एकाचे नाव दत्ता जाधव (Dutta Jadhav) (राहणार फुलेनगर परळी) असे आहे. तर तीन वर्षांपूर्वीच्या बातमीनुसार कुंटणखाना चालवणाऱ्या ज्या महिलेला अटक झाली होती तिचे नाव जयश्री दत्ता जाधव (Jayashree Dutta Jadhav) (राहणार फुलेनगर परळी) असे आहे.
Protest for Walmik Karad
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया फ्रंट प्रदेश अध्यक्ष महादेव बालगुडे (Mahadev Balgude) यांनी एक्सवर माहिती दिली आहे. “कराडच्या समर्थनार्थ पेटवून घेणाऱ्याचे नाव दत्ता जाधव राहणार फुलेनगर परळी असे आहे तर तीन वर्षांपूर्वीच्या बातमीनुसार कुंटणखाना चालवणाऱ्या ज्या महिलेला अटक झाली होती तिचे नाव जयश्री दत्ता जाधव राहणार फुलेनगर परळी असे आहे. असे अजून चांगले लोक कराडच्या समर्थनार्थ पुढे आले पाहिजेत,” अशा आशयाची पोस्ट बालगुडे यांनी एक्सवर केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे एखाद्या खंडणीखोर व्यक्तीला देवमाणूस म्हणणे कितीपत योग्य आहे? जर आपल्या आसपास अशा गुन्हेगारांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे लोक असतील तर पुढे आपले भविष्य काय असेल? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात पडला आहे. अशा समाजकंटकांना आपण कोणाचे समर्थन करत आहोत? याचे गांभीर्य समजले पाहिजे.