
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
महाराष्ट्रात सर्वात मोठी एमआयडीसी असलेले चाकण एमआयडीसी परिसरामध्ये
महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीच्या मालकावर दोन अनोळखी इसमांनी गोळीबार केला असल्याची घटना आज घडली. आरोपी हेल्मेट घालून होंडा शाईन मोटरसायकलवरून आले होते. घटनास्थळी फायरिंग केल्यानंतर आरोपी वराळे ते भांबोली या दिशेने पळून गेले.
या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व हद्दीत नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस नियंत्रण कक्षाला सतर्क करण्यात आले असून पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनाही कळविण्यात आले आहे. खेड आणि शिक्रापूर परिसरातही नाकाबंदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून घटनेचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.