
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा सातत्याने आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर कराडने एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीला सरेंडर केलं आहे. यानंतर वाल्मिक कराडबाबतच्या (Walmik Karad) सगळ्या बाबींची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येत आहेत. आता या चौकशीसंबंधातील नवी अपडेट समोर आली आहे.
यामध्ये वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये देखील बेनामी संपत्ती जमवल्या असल्याचा सीआयडीला (CID) संशय आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस कराड यांच्याशी संबंधित असलेल्या महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भात सीआयडी कडून चौकशी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पुण्यातील एका भाजपच्या माजी नगरसेवकाची चौकशी सीआयडीने केली आहे.
वाल्मिक कराडप्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची आज सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. पुण्यात वाल्मिक कराडची दुसरी बायको मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली. या या खरेदीमध्ये खाडेंनी मध्यस्थी केला असल्याचा संशय सीआयडीला आहे. या संशय असल्याच्या पार्श्वभूमीवरती दत्ता खाडे यांची सीआयडीने चौकशी केली असल्याचं बोललं जात आहे.
काही वेळापूर्वीच ही चौकशी संपली असून खाडे पुण्याला यायला निघालेत. वाल्मिक कराडचे पुण्यातील फर्गुसन महाविद्यालयाच्या समोर उभ्या रहात असलेल्या इमारतीत दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे दोन ऑफीस स्पेसेस खरेदी केलीत. खाडेंच्या मध्यस्थीने हा व्यवहार झाल्याचा संशय आहे. दत्ता खाडे हे गोपीनाथ मुंडेंपासून वाल्मिक कराडला ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे.
माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते, तेव्हा कराडशी..!
वाल्मिक कराडचे संबंध असल्याचा संशय सीआयडीला होता. म्हणून आज त्यांनी मला चौकशीला बोलावलं होतं. माझी चौकशी झाली, मी जी काही उत्तर द्यायची आहेत, ती दिली आहेत. माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते, तेव्हा माझी कराडशी तोंड ओळख आहे.वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही. माझी चौकशी झाली, मी सीआयडीला सहकार्य केलं आहे, असं खाडे म्हणाले आहेत.