
म्हणाल्या, ‘तो माझा वैयक्तिक…
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशखून यांनी निर्घूण हत्या करण्यात आली. या हत्येचा संशय मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर व्यक्त करण्यात आला.
हत्ये प्रकरणातील आरोपांना पोलिसांना अटक केली आहे तर कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली गेली आहे. मात्र, देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटंबीयांची मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली नसल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
आमदार सुरेश धस यांनी जाहीर सभेतून पंकजा मुंडे यांच्यावर देशमुख कुटुंबीयांची भेट न घेतल्याने निशाणा साधला होता. मात्र, पंकजा मुंडे यांनी स्वतः देशमुख कुटुंबीयांची भेट न घेण्याचे कारण जाहीर केले आहे. माध्यमांशी बोलताना पंकजा यांनी देशमुख कुटंबीयांची भेट का नाही घेतले हे सांगितले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘देशमुख यांच्या कुटंबीयांनी मला विनंती केली ताई तुम्ही येऊ नये इथली परिस्थिती आमच्या हातात नाही. देशमुख कुटुंबीयांची परवानी घेऊन मी तेथे जाईल हे मी आधीच सांगितले आहे. पण माझ्या जाण्यापेक्षा आधी तेथे न्याय जाणे आवश्यक आहे.’
पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की देशमुख कुटुंबीयांच्या विनंतीवरूनच आपण मस्साजोगला त्यांची भेट घेण्यासाठी गेलो नाही.
‘मी तेथे जाणे, मृत्यूविषयी संवेदना बाळगणे हा माझा सर्वस्वी वैयक्तिक विषय आहे. त्याचे जगासमोर प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नाही. माझ्या ईश्वराला,मला, जनतेला आणि देशमुख परिवाराला हे माहिती आहे या विषयी मला पूर्ण सहानूभुती आहे.’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या तसेच कोणाला मारले तर त्या विषयी सहानुभीती का नसेल? असा प्रतिप्रश्न केला.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तो आपलाच कार्यकर्ता होता. त्याच्या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटी नेमावी, अशी मागणी आपण सर्वप्रथम केली होती, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले होते. संतोष देशमुख हा माझाच बूथप्रमुख होता तो सरपंच असताना माझ्यासोबत काम करत होता, असेही मुंडे यांनी सांगिले होते.
बीडचे पालकमंत्रिपद न भेटल्याने नाराज
बीडचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे यांना देण्यास मोठा विरोध होता. त्यानंतर बीडचे पालकमंत्रि म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर, पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. मात्र, बीडची लेक म्हणून बीडची जबाबदारी मिळाली असती तर आनंद झाला असता. प्रत्येकवेळी तुम्हाला सेम काम करण्याची संधी मिळते असे नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती.