
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे. सीरिजच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या बॉलरनी इंग्लंडला एकामागोमाग एक धक्के दिले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर अर्शदीप सिंगने सुरूवातीलाच इंग्लंडला लागोपाठ 2 धक्के दिले.
इंग्लंडचा ओपनर फिल सॉल्ट पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला शून्य रनवर आऊट झाला, यानंतर अर्शदीपने त्याच्या पुढच्याच ओव्हरला इंग्लंडचा दुसरा ओपनर बेन डकेटला 4 रनवर आऊट केलं. यानंतर वरुण चक्रवर्तीनेही इंग्लंडला लागोपाठ दोन धक्के दिले. वरुणने हॅरी ब्रुकला 17 रनवर आणि लिव्हिंगस्टोनला शून्य रनवर बोल्ड केलं. पहिल्या 10 ओव्हरमध्ये इंग्लंडने 74 रन करून 4 विकेट गमावल्या.
11.5 कोटींचा खेळाडू फेल
काहीच दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएल लिलावामध्ये आरसीबीने ज्या खेळाडूवर 11.5 कोटींची बोली लावली, तोच खेळाडू पहिल्या सामन्यात अपयशी ठरला आहे. आयपीएलचा 2025 चा मोसम सुरू व्हायला फक्त दोन महिने शिल्लक आहेत, त्याआधी भारत-इंग्लंड यांच्यात ही टी-20 सीरिज होत आहे, पण या सीरिजच्या पहिल्याच मॅचमध्ये आरसीबीचा फिल सॉल्ट शून्य रनवरच पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
भारताची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्सर पटेल, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
इंग्लंडची प्लेयिंग इलेव्हन
बेन डकेट, फिल सॉल्ट, जॉस बटलर, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथल, जेमी ओव्हरटन, गस अटकिनसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड