
कोल्डप्ले बँडचा अंतिम कॉन्सर्ट अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. बँडचा प्रमुख ख्रिस मार्टिन याने प्रजासत्ताकदिनी करोडो भारतीयांचं मन जिंकलं.
माँ तुझे सलाम आणि वंद मातरम म्हणत स्टेडियमवर उपस्थित असलेल्या लाखो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. प्रेक्षकांनी देखील जयघोषात आणि टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला होता. मात्र, राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर स्टेडियमवर उपस्थित असलेल्या लाखो लोकांनी एकसुरात राष्ट्रगीत गायलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
ख्रिस मार्टिन याने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमावेळी जन गण मन सुरू झालं तेव्हा स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी एकसुरात राष्ट्रगीत गायलं. दुश्मन देशाला पण घाम फुटेल असा माहोल स्टेडियमवर होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अहमदाबादच्या कोल्डप्ले कॉन्सर्टला टीम इंडियाचा स्टार क्रिकेट जसप्रीत बुमराह याने हजेरी लावली होती.
जसप्रीत बुमराहसह पार्थिव पटेल, प्रफुल्ल दवे, इशानी दवे, जिग्नेश मेवाणी देखील कॉन्सर्टला उपस्थित होते. कॉन्सर्टमध्ये जसप्रीत बुमराहचा व्हिडीओ देखील ख्रिस मार्टिनने दाखवला. तर त्याने बुमराहसाठी खास गाणं देखील गायलं. त्याआधी भारतीय गायिका जसलीन रॉयलने कोल्डप्ले फ्रंटमॅन ख्रिस मार्टिनसह बँडच्या नवीनतम अल्बम मून म्युझिकमधील ‘वुई प्रे’ या ट्रॅकसह युगल गाणं गायलं. त्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
दरम्यान, कोल्डप्ले बँडची सुरुवात 1997 मध्ये लंडनमध्ये झाली. ख्रिस मार्टिन, जॉनी बकलँड, गाय बॅरीमन, विल चॅम्पियन आणि फिल हार्वे हे या बँडचे सदस्य आहेत. कोल्डप्लेला 39 नामांकनांमध्ये 7 वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.