
|| देह जावो हेचि घडी । पाय हरिचे न सोडी ॥१॥ क्लेश होत नानापरी । वाचे रामकृष्ण हरी ॥२॥ नाचू वैष्णवांचे मेळी । हाक विठ्ठल आरोळी ॥३॥ नामा म्हणे विठोबासी । जें ते घडो या देहासी ॥४
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
आळंदी..पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा सर्वांचे सदगुरु एकनिष्ठ ब्रह्मचारी असलेले हृदयी निवासी सद्गुरु विठ्ठल बाबा देशमुख यांच्या दशम पुण्यतिथी सोहळा आळंदी येथील ह भ प सद्गुरू विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा वडगाव रोड आळंदी येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
दि ४रोजी ह भ प कैलास महाराज येवले आळंदी यांचे कीर्तन सायं ६ ते ८ दि ५ रोजी ह भ प रामेश्वर महाराज भोजने आळंदी सकाळी १० ते १२ किर्तन सेवा होणार आहे आणी सायं ह भ प गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर आळंदी देवाची यांच्या अमृतवाणी किर्तन सायं ६ ते ८ दि ६ रोजी सकाळचे किर्तन ह भ प ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे आळंदी १० ते१२
सायंकाळी सद्गुरु विठ्ठल बाबा देशमुख यांचे शिष्य श्रीनिवास महाराज घुगे सायं ६ ते ८ किर्तन
दि ७ रोजी ह भ प साधक हृदय गुरुवर्य डॉ नारायण महाराज जाधव आळंदी देवाची यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ होणार आहे असुन नंतर महाप्रसाद होईल सदर कार्यक्रम सद्गुरु विठ्ठल बाबा देशमुख भक्त परिवाराच्या उपस्थितीत व आर्थिक सहकार्याने संपन्न होईल तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे स्थळ सद्गुरु हृदय निवासी विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा वडगाव रोड आळंदी देवाची जिल्हा पुणे या दशम पुण्यतिथी सोहळा आपण सर्व पंचक्रोशीतील व महाराष्ट्रातील निमंत्रित करीत आहे ह भ प श्री श्रीनिवास महाराज घुगे यांनी आवाहन केले आहे