
मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले आहेत. करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणातील जी तक्रार केली होती.
त्यातील आरोप मान्य करण्यात आले आहेत. याप्रकरणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. करुणा शर्माला कुणाची तरी बहीण लेक आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
घरगुती हिंसाचार प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणातील जी तक्रार केली होती. त्यातील आरोप मान्य करण्यात आले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टानं हा निर्णय दिला आहे. करुणा शर्मा यांनी केलेले आरोप मान्य केले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. या प्रकरणावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की करुणा शर्मा यांना न्याय मिळालाच पाहिजे.
संतोष देशंमुख हत्या प्रकरणातील आरोपींची ईडी चौकशी करा
संतोष देशंमुख हत्या प्रकरणावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. तपास यंत्रणेनं चांगलं काम करावं. चारशीटध्ये सगळ्या गोष्टी येणं अपेक्षित आहे. खून होण्याआधीपासूनच एक महिन्याचे सगळे सीडीआर चार्ज शीटमध्ये आले पाहिजेत असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच या प्रकरणातील सगळे आरोपींची ईडी चौकशी करा अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
लेकीचं भविष्य समजतं मग आमचं का नाही? जरांगे पाटलांचा फडणवीसांना सवाल
अडचण आले की मराठे पाहिजेत आणि गरज संपली की सोडून देतात. मात्र, सध्या मराठा आरक्षणाचा विषय घेत नाहीत हे दुर्दैव असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. माझी मुलगी दहावीला आहे म्हणून मी वर्षा वर जात नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लेकीचं भविष्य समजतं मग आमचं का नाही? असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी डोळे घडले पाहिजेत, धनगर समाजानेही डोळे उघडले पाहिजेत असे जरांगे म्हणाले. लेकीच्या शब्दाखातर तुम्ही 500 मीटरवर जात नाहीत.
मराठ्यांच्या लेकरात पण मुलगी बघा. तुम्हाला आमच्या लेकी दिसत नाहीत का? तुमचं ते चांगलं आणि दुसऱ्याच ते कार्ट असेही जरांगे पाटील म्हणाले.