
विविध नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना काहीतरी अंतर्गत खदखद सुरू आहे. याचा रिमोट सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. दिल्लीत जाऊन काही उपयोग नाही. हे सगळे दिल्लीच्या इशाऱ्यावर होत आहे.
दिल्लीश्वर सांगतात तेच महाराष्ट्रात होत आहे. गावपातळीवर भानगडी प्रमाणे सरकारमध्ये गडबड सुरू आहे असा आरोप काँग्रेसचे नवनियुक्त गटनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. मला कोणतेही जबाबदारी दिली तरी मी पार पडेल. आमची संयुक्त जबाबदारी असेल उत्तम समन्वय करून संवाद ठेवून महाराष्ट्रातील सर्वांशी, त्यांच्याबरोबर सगळ्यांना विश्वासात घेऊन नवीन सुरुवात यावेळी झालेली दिसेल.
मग मागील काळात समन्वय नव्हता का ? या प्रश्नाच्या उत्तरात वडेट्टीवार म्हणाले, ज्या गोष्टी घडून गेल्या. जे महाभारत झाले त्यावर नव्याने बोलायचं नाही. नवीन टिपणी करायची गरज नाही, एक नक्की आमच्यात समन्वयाचा अभाव होता. तो मात्र आता पुढच्या काळात दिसणार नाही हे विश्वासाने सांगतो. पक्षात असो की महाविकास आघाडीचे मित्र पक्षात असो समन्वय राहील. विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकारचा ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे. लोकांचा भ्रमनिरास झालाय असा आरोपही केला.
पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा विधिमंडळ नेता म्हणून काम करण्याची संधी दिली. एकीकडे बहुमत असलेला सत्ताधारी आणि अल्प संख्या असलेले विरोधक असा सामना आहे.पाच वर्ष जनतेसाठी काम करू, हर्षवर्धन सपकाळ पूर्णवेळ संघटनेचा कार्यकर्ता म्हणून सेवा भावी विचारांचे व्यक्तिमत्व आहे. तुळशीपत्र वाहून पूर्णवेळ काम करणारा नेता म्हणून त्यांना अध्यक्ष केले आहे.दोघे मिळून काम करू, राज्यात पक्ष मजबूत करू असे सांगितले. विदर्भ काँग्रेससाठी गड राहिलेला आहे. विदर्भातील जनता पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी ताकदीने उभी राहील यावर भर दिला.
दरम्यान,सत्ता मिळाली की, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. यापेक्षाही आमचे चांगले दिवस येईल. बावनकुळे यांना सांगतो दुसऱ्यांना कधी कमी लेखू नये असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला.