
नुकतच आंध्र प्रदेशातील बालाजी देवस्थान असलेले तिरुपतीमध्ये आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन आणि एक्सपो आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष होतं. या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि चंद्रबाबू नायडू यांनी मोठी घोषणा केली.
यामध्ये मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी आत्मनिर्भर आणि तांत्रिक दृष्ट्या संपन्न असे मंदिर बनवलं जावं अशी इच्छा व्यक्त केली. तसेच यावेळी त्यांनी मंदिरांचा महा कुंभ असं म्हणत हे चर्चासत्र मंदिर प्रशासन त्याचबरोबर आर्थिक योगदान आणि सांस्कृतिक संरक्षण या विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितलं.
त्याचबरोबर याच कार्यक्रमात मुख्यमंत्री नायडू यांनी मोठी घोषणा केली त्यांनी सांगितलं की त्यांचं सरकार देशातील प्रत्येक राज्याचे राजधानी आणि प्रमुखांतराष्ट्रीय शहरांमध्ये बालाजी मंदिराची स्थापना करणार आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थान आणि आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन आणि एक्सपो अंतर्गत या मंदिरांची निर्मिती केली जाईल.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय विद्युत आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसू नाईक, टीडीपी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू तसेच आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन आणि एक्सपोचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.