■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.
जैतापूर :- ( होळी) :- ऐतिहासिक वारसा असणारे राजापूर तालुक्यातील होळी गाव,आणि या होळी गावचे ग्रामदैवत आई भरत दुर्गा,साक्षात सवाई माधवराव पेशवेकालीन इतिहास असणारी हे होळी गाव आणि या आई चा मार्च मध्ये होणार शिमगोत्सव काही दिवसावर येऊ घातला आहे.अतिशय सुंदर अश्या नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम हे दरवर्षी साजरे होत असतात.
आई भरत दुर्गा देवी चा शिमगोत्सव येत्या २ आणि ३ मार्च ला साजरा होणार आहे.याची रूपरेषा अनुक्रमे दि.०२ मार्च २०२६ दुपारी १२.३० महाप्रसाद, सायं. ७.०० वाजता लोककला रंगमंच कणकवली प्रस्तुत विविध लोकनृत्य कलांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम ” नृत्यांग”,रात्री १०.०० वाजता होळीचा होम.त्यांनंतर ०३ मार्च सकाळी १०.०० वाजता देवीची पूजा व धुपारत,आणि रात्री ९.०० वाजता देवीचा खेळ आणि इतर पाच गावचा खेळ अश्या प्रकारे भरगच्च कार्यक्रम होणार असून,या कार्यक्रमाला विभागातील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री भरत दुर्गा मंदीर चे खोत विघ्नेश गोखले यांनी केले आहे.
