
शिवजयंतीनिमित्त नरेंद्र मोदींची मराठीतून पोस्ट !
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करत शिवरायांना अभिवादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केली शेअर-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीय. छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी फक्त राजा, महाराजा, राजपुरुष नाहीय, तर माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवात आहेत आणि आराध्य दैवतांपेक्षा मोठं काहीही नाही, असं नरेंद्र मोदी व्हिडीओमध्ये बोलताना दिसताय.
अमित शाह यांनीही केलं शिवरायांना अभिवादन-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील पोस्ट करत शिवजयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. हिंदवी स्वराज्याचा” उद्घोष करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन नीती, कर्तव्य आणि धर्मपरायणता यांचा संगम होते. कट्टरपंथी आक्रमकांच्या विरुद्ध जीवनभर संघर्ष करून सनातन स्वाभिमानाचे धर्म ध्वज रक्षक छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रनिर्माता म्हणून सदैव स्मरणीय असतील. शिवजयंतीच्या निमित्ताने अद्वितीय साहसाचे प्रतीक, छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी नमन…, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.