
पक्ष वाढवण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. ते जर आधी केले असते तर ही वेळ आली नसती. आता वेळ निघून गेली आहे. आता किती बैठका घेतल्या, कितीही मंगळवार केले तरी ठाकरे यांना यश प्राप्त होणार नाही.
अनेक नेते लवकरच शिवसेनेत सहभागी होणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापुरात प्रचार माध्यमांशी बोलताना सांगितले.
परिवहनमंत्री सरनाईक बुधवारी (दि. 19) सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. सोलापुरातील शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या शिवभोजनास भेट दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी साधताना उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांना टीकेचे लक्ष केेले.
उद्धव ठाकरे सेनेचे
अनेक नेते शिवसेनेत सहभागी होत आहेत. त्यांचे आम्ही पक्षात स्वागत करत आहोत. आत ठाकरेंच्या पक्षाला गळती अटळ आहे. गांधी परिवाराने केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेस विषयी बोलावे. देशातील आराध्य दैवतांबाबत त्यांनी काही बोलू नये. त्यांना काही माहिती नाही. राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी छत्रपती शिवरायांनी काय केले हे राहुल गांधींना माहिती नाही. त्यामुळे देशाच्या विरोधी पक्षाचे नेतृत्व करणारा व्यक्ती शिवरायांना अशी श्रद्धांजली वाहत असेल तर मी त्याचा धिक्कार करतो. त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.
देशात शिवरायांना मानणारा सर्वात मोठा नेता नरेंद्र मोदी आहेत. शिवरायांबद्दल बोलताना मोदींची छाती फुलून येते. त्यांच्या मनात शिवरायांबद्दल प्रचंड आदर असल्याचेही त्यांनी सांगितले. विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकूर प्रकरणात कमल खान सारख्या माणसाला रस्त्यावर उतरून तुडवलं पाहिजे. आमचे शिवसैनिक पोहोचले तर त्याला रस्त्यावर जोड्याने मारतील, अस इशाराही खान यांना दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झंजावात आपल्याला पाहायला मिळेल हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
खा. राऊतांना टोला
खा. संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची तुलना होऊ शकत नाही. कोणीतरी सकाळी उठून कोल्हे कुई करतो, त्या प्रत्येकाला आम्ही उत्तर देणे योग्य नाही. एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला, त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे आम्ही दाखवून दिले, अशा शब्दात खा. राऊत यांना टोला लगावला.