दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-किशोर फड
बीड/अंबाजोगाई
*मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा प्राप्त झाला असून तिचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे :-लक्ष्मी घुगे बाई.*
(मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा.)
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात पाचवी ते सातवी विभागामध्ये आज राज्यभाषा मराठी दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री शैलेंद्र कंगळे सर तर मंचावर
प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले,
पाचवी ते सातवी विभागाच्या परिवेक्षिका श्रीमती रूपाली मुळे बाई प्रमुख मार्गदर्शक सौ लक्ष्मी घुगे बाई व अभ्यास पूरक मंडळ प्रमुख ज्योती शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती,कवी कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा.शिरवाडकर,वि.दा.सावरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.यावेळी इ. 5वी अ मधील विद्यार्थीनींनी सुंदर असे कविता सादर केली केल्या तर सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रक तयार केले. मान्यवरांच्या हस्ते त्याची विमोचन करण्यात आले.तर
सातवी ब मधील विद्यार्थिनीं यांनी विविध विषया वरील स्वरचित कविता सादर सानिका शिंदे व श्रावणी नागराळे यांनी केल्या.या वेळी विद्यालयातील मराठी अध्यापकांचे स्वागत करण्यात आले.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्रीमती लक्ष्मी घुगे बाई म्हणाल्या की,मराठी संपन्न भाषा आहे.संताची मोठी परंपरा या मराठी भाषेतून निर्माण झाली.सातवाहन काळात निर्माण झालेल्या शिला
लेखात मराठी भाषेचा उल्लेख आला आहे.त्यामुळे मराठी भाषेला
अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
मराठी भाषेचा अभिमान बाळगा.
मराठी भाषेचा दर्जा खूप मोठा असून ती जपा.वाचन संस्कृती
वाढविण्यासाठी घराघरांतून खूप प्रयत्न होणे आवश्यक आहे.मराठी हीच इतर भाषेची जननी आहे.
अध्यक्षीय समारोप करताना उपमुख्याध्यापक श्री शैलेंद्र कंगळे सर म्हणाले की,वि.वा. शिरवाडकर यांनी बालपणापासून कविता करायला सुरुवात केली.त्यांचे भाषेवर प्रभुत्व निर्माण झाले.
आपणही आपल्या मराठी भाषेचा अभिमान व दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आपल्यातील वाचन संस्कृतीत वाढ,
इंग्रजी शब्दांचा कमी वापर,
शुध्दलेखन चांगले असणे या सर्व गोष्टी आपण अंगिकारल्या पाहिजेत.
आपल्या भाषेला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले पाहिजेत..
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनंतराम कोपले, उपमुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे, पर्यवेक्षिका श्रीमती रूपाली मुळे बाई अभ्यास पूरक मंडळ प्रमुख श्रीमती ज्योती शिंदे मराठी विषय प्रमुख,कार्यक्रम प्रमुख लक्ष्मी घुगे बाई, मराठी विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग 5वी तील विद्यार्थीनींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसांचलन अर्पिता मुंडे व स्वागत परिचय रिशिका मोहाडे ,वर्ग 5 वी तुकडी ब यांनी केले तर प्रास्ताविक श्री संतोष सुळ सर यांनी केले
आभार पाचवी अ मधील सृष्टी गुट्टे हिने मानले. कार्यक्रमाची सांगता राज्य गीताने करण्यात आली.
