
सरकारने मान्य केली ‘ही’ मागणी…
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगवासियांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनावणे हे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे.
तर, दुसरीकडे राज्यात मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडीवरून रणसंग्राम सुरू आहे. राज्यातील विविध खात्यातील दलाली रोखता यावी याकरता मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्यानंतर आता त्यांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.