
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
आळंदी नगरपरिषदअर्थसंकल्प
तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी तरतूद करणारी राज्यातील पहिली नगरपरिषद
तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या आळंदी नगरपरिषदेचा 2025-26 आर्थिक वर्षाचा 6.65 लक्ष इतक्या शिलकीसह 89.51 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सादर केला. या मध्ये अर्थसंकल्पात स्वरूपाची उल्लेखनीय बाब म्हणजे ‘तृतीय पंथीयांच्या‘ कल्याणासाठी अर्थसंकल्पात 3% तरतूद करण्यात आली आहे. अश्या स्वरूपाची तरतूद केल्यामुळे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या तृतीय पंथीय कडुन सत्कार करण्यात आला
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 101 व महाराष्ट्र नगरपरिषदा लेखासंहिता 2013 चे नियम क्रमांक 404 ते 431 अन्वये आळंदी नगरपरिषद प्रशासक नात्याने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी 2024-25 च्या सुधारित अर्थसंकल्पासह 2025-26 चे नियमित अंदाजपत्रक सादर केले. अर्थसंकल्पात महिला,बालक,दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक,तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
असुन तृतीय पंथीयांच्या नागरिकांना वैद्यकीय पाॅलीसी तसेच उदरनिर्वाह चालविण्यासाठी थेट महाडिबीटी अनुदान दोन लाखांपर्यंत विविध प्रकारच्या योजना लागु केल्या आहेत
स्थानिक आळंदी येथील राहीवासी असलेले फक्त हि योजना लागु राहील तुतीय पंथीयांच्या अध्यक्ष प्रज्ञा पाटील यासह आळंदी येथील नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी सचिन अण्णा गिलबिले ( आळंदी शहर उपाध्यक्ष अथ्यक्ष) पदमाकर तापकीर अक्षय भोसले विशाल थोरात रामदास दाभाडे सचिन गायकवाड संजय गिरमे उपस्थित होते