
सुरेश धस ED कडे करणार तक्रार…
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीनं जोर धरला होता.
मुंडेंनी ४ मार्चला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्यावरील संकटं कमी होताना दिसत नाहीयेत.
कृषी विभागातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे मुंडेंवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी थेट ईडीकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
माजी मंत्री धनंजय देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्यावरील संकटं कमी होताना दिसत नाहीयेत. आता सुरेश धस थेट ईडीकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. कृषी विभागातील कथित घोटाळाप्रकरणी सुरेश धस ईडीला पत्र लिहून ईडीकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरेश धस यांनी यापूर्वीच दावा केला होता की, तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची तब्बल २०० रूपये परस्पर उचलली होती. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी देखील पुराव्यानिशी कृषी घोटाळाप्रकरणी मुंडेंवर आरोप केले होते. त्यामुळे या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सुरेश धस ईडीला पत्र लिहून तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.