दैनिक चालु वार्ता बिड माजलगाव प्रतिनिधि -नाजेर कुरेशी
माजलगांव शहरात कचरांची घाण ढगेच्याढगे रस्त्यांवर पडुन आहे, घंटीगाड्या पुर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे घरातील कचरा कोठे टाकायची असा प्रश्न सामान्य महिलांना पडत आहे तसेच नाल्या पुर्णपणे भरल्यामुळे घाणपाणी रस्त्यांवर येऊन दुर्गंधीवास पसरल्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत असुन पेमेंट मुळे माजलगाव नगरपरिषद चे मुख्याधिकारी व स्वच्छता टेंडरधारकात संघर्षा वाढल्यामुळे माजलगांवकरांचे आरोग्य धोक्यात आले त्यामुळे माजलगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारींनी तात्काळ स्वच्छता टेंडर रद्द करुन फुकट पगारी उठवणारे स्वच्छता कर्मचाऱ्यांना तात्काळ कामाला लावुन माजलगाव शहरातील घाण स्वच्छ करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता शेख रशिद यांनी केली आहे.
माजलगाव नगरपरिषद ने दोन वर्षांपूर्वी स्वच्छता टेंडर प्रक्रिया करून टेंडर घेण्यात आले त्यात करोडोंचा खर्च राज्य सरकार करुन ही माजलगाव शहरात सध्या घाणच घाण पसरली आहे त्यामुळे राज्य सरकारचा करोंगा नुकसान होत आहे त्यामुळे मुख्याधिकारीने तात्काळ स्वच्छता टेंडर रद्द करुन फुकट पगारी उठवणारे स्वच्छता कर्मचाऱ्यांना तात्काळ कामाला लावुन माजलगाव शहर स्वच्छता करावे नसता लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ता शेख रशिद यांनी सांगितले आहे.
