
दैनिक चालु वार्ता धर्माबाद प्रतिनिधी -किरण गजभारे
धर्माबाद:शहरातील पोलिस वसाहतीच्या समस्यांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनला आहे.
नवनव्या संकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पोलिसयंत्रणा अधिक गतिमान होत आहे; मात्र पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीअभावी पोलिस निवासस्थाने धोकादायक झाली असल्यामुळे अनेकजण भाड्याच्या घरात राहतात. सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी खांद्यावर घेऊन दिवसरात्र राबणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने असूनही बेघरांसारखे भाड्याच्या घरामध्ये राहावे लागत आहे.
कुटुंबियांना सोडून केवळ आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र कर्तव्य बजावत असतात. मात्र धर्माबाद शहरात परिस्थिती भयाण आहे. आपल्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंब मात्र सतत मृत्यूच्या सावटाखाली वावरत आहे. इतकेच नव्हे तर स्वतः पोलीस आपल्या कर्तव्य वरून आल्यावर ते देखील या मृत्यूच्या सावटाखाली वावरतात. पोलीस वास्तव्यास असलेली इमारत मात्र मोडकळीस आली आहे. अनेक घरामधील छताचे गज दिसत आहेत, काही ठिकाणची स्लॅब तुटलेले, कसल्याही प्रकारची रंगरंगोटी नाही,तडे गेलेले तर अनेक ठिकाणी स्वछता गृहाचे पाणी पाईप द्वारे गळती झाल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. याशिवाय याच दुर्गंधी मध्ये आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या आवारात जीव धोक्यात घालून हे कुटुंब मृत्यूच्या दाढेत वावरत आहे.
आमदार राजेश पवार हे काही वर्षांपूर्वी धर्माबाद तालुक्याच्या दौऱ्यावर होते. आपल्या निधीतून होत असलेल्या विकास कामावर कटाक्षाने नजर टाकत ते येताळा बाभूळगाव अशी गावे करत धर्माबाद पोलीस ठाण्यामध्ये आले.पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी त्यांचे विशेष स्वागत करून धोकादायक बनलेल्या पोलीस क्वार्टर बद्दल माहिती दिली. आमदार राजेश पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता सदरील कामे कुणाच्या माध्यमातून प्रस्तावित करता येतात याची जाणकारी लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राम गळधर यांच्याकडून घेतली.व थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून याबाबत तातडीने निधी कसा मिळवता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. यामध्ये जुनी इमारत डिमालीश करून त्या जागी नवीन आद्ययावत इमारत बांधणे,ततद्वतच शांतता समितीची बैठक वारंवार घेण्यासाठी हॉल उपलब्ध करणे यासाठी तात्काळ इस्टिमेट बनवायला त्यांनी सांगितले. परंतु आजतागायत कुठल्याच कामाला सुरुवात झालेली नाही. नक्कीच कार्यसम्राट आमदार राजेश पवार पोलिस बांधवांच्या वसाहती साठी निधी उपलब्ध करून देतील का हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे.
धर्माबाद येथील पोलिस वसाहतीची गंभीर दुरवस्था आहे, जिथे अनेक कर्मचारी जीव धोक्यात घालून राहतात, कारण निवासस्थाने व्यवस्थित नाहीत
“”अनेक वर्षांपासून या वसाहतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, ज्यामुळे ती जीर्ण होत चालली आहे.
“”या दुरवस्थेमुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या राहत्यावर परिणाम होत आहे, तसेच ते कामावर योग्यरित्या लक्ष देऊ शकत नाहीत तरी देखील पोलीस बांधव आपले कर्तव्य एकनिष्ठतेणे बजावतच असतात.
“”धर्माबाद पोलिस ठाण्याच्या जवळ असलेल्या वसाहतीची अवस्था पाहून नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिस बांधव राहतातच कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
“” आमदार राजेश पवार हे आपल्या मतदारसंघात अत्यंत कमी वेळात विकास कामे करून दाखवली. त्यांनी पोलिस बांधवांच्या वसाहतीसाठी दिलेले आश्वासन पूर्ण करतील अशी अपेक्षा सर्वसामान्यात व्यक्त होत आहे.