
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली (शिंदेवस्ती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा् निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागणार असल्याने या शाळेतील हा शेवटचा दिवस असल्याने यावेळी विद्यार्थी भावुक झाले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता निवृत्ती शिंदे हे उपस्थित होते.
यावेळी निवृत्ती शिंदे यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे महत्त्वाचा घटक आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो घेणारा माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांनी या शाळेतून गेल्यानंतर मोठे होऊन आई-वडील, शाळा, शिक्षक व गावाचे नाव लौकिक केले पाहिजे.आई वडील रोज कष्ट करून आपल्याला शिक्षण देतात त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे .तसेच विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी पाहिजे आपले आचार-विचार व संगत चांगली असली पाहिजे.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शेटफळ हवेली येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटी शेटफळ हवेलीच्या विद्यमान संचालिका गौरी शिरीष शिंदे यांच्या वतीने स्नेह भोजन चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी निवृत्ती शिंदे, अविनाश शिंदे, शिरीष शिंदे, मनीषा शिंदे, गौरी शिंदे,निता बाळकृष्ण नवले,माधुरी अनिल हेरूर,वारणा रविंद्र माने, विशाल शिंदे, महेश भोंगळे,कृष्णा माने, तन्मय सचिन वारे,शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत कुलकर्णी, सहशिक्षक सुभाष चव्हाण, आदी मान्यवर, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.