
कुणी लाटली ३४ एकर जमीन…
मुंबई: महायुती सरकारमधील मंत्री, आमदार आणि नेत्यांचे आता कारनामे समोर येत असून यामुळे विधीमंडळात जोरदार चर्चा आणि वाद होतायत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाचे नेते धनंजय मुंडेंवर आरोप झाल्याने त्यांना मंत्री पद सोडावं लागलंय
दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि जयकुमार गोरे यांच्यावरही आरोप झालेत. त्यातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही मोठा आरोप करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी पडळकरांवर काय आरोप केलेत पाहूया.
आमदार गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानची जमीन लाटल्याचा आरोप
सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंचे आरोप
३४ एकर जमीन पडळकरांनी लाटल्याचा दावा
मंत्री चंद्रकांत पाटील, सुरेश धस, प्रकाश सोळंकेंच्या कार्यकाळातील घोटाळा
देवस्थानची जमीन खालसा करण्याचा व्यवहार
व्यवहारात चंद्रकांत पाटील यांनी मदत केल्याचा आरोप
दरम्यान, हे प्रकरण विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच समोर आल्याने आता एकच खळबळ उडाली आहे. तर यासंदर्भात पडळकरांनी आपली भूमिका मांडली आहे. महायुतीत सरकार मंत्री आणि काही नेत्यांमुळे अडचणीत आलंय. विविध वक्तव्य आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सरकारमधील पहिली विकेट पडलीये. तर पुढच्या सहा महिन्यात दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा पडेल असा दावा विरोधक सातत्यानं करतायत.त्यामुळे महायुतीसाठी काळ खडतर असल्याचं दिसतंय. यातून महायुती तरणार की राजीनाम्यांमुळे सरकारला धक्के बसत राहणार हेच पाहायचं.