
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी- किशोर फड
बीड/अंबाजोगाई
मराठवाड्यातील उभयता तारा अभिनेता ऋषिकेश मुंडे सध्या “स्टार प्रवाह” चॅनेलवरील लोकप्रिय मालिका “उदे ग अंबे उदे” या मालिकेत एंट्री करतो आहे .ऋषिकेश च्या बाबतीत सांगायचं झालं तर तो सध्या पुण्याला बी फार्मसी शिक्षण करत करत अभिनय क्षेत्रात सुध्दा त्याची छाप पाडतो आहे ,अभिनयाची आग त्याच्या मनाशी बाळगून सध्या तो अभिनयाचे नवनवीन धडे गिरवत आहे सध्या तो असं म्हणतो की भाकरी ही दोन्ही बाजूंनी भाजून खाल्ली तर त्याला चव लागते तसंच ऋषिकेश सध्या एकिकडे शिक्षण आणि दुस-या बाजूने अभिनय क्षेत्र यांची सांगड घालत आहे आणि सध्या तो अभिनय क्षेत्रात सरस ठरत आहे तो सध्या मुंबई -पुणे प्रवास करत त्याची भाकरी दोन्ही बाजूंनी भाजण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांने “उदे ग अंबे उदे” या मालिकेत पहिल्यांदाच फाईट सिक्वेंस केला आहे याबाबतीत तो म्हणतो की कलाकार म्हणून मी जगत असताना नवंनवीन रुप धारण करायला मला मिळतात आणि कधीही न अनुभवलेला अनुभव मला सहज मिळून जातो त्यामुळे माणूस म्हणून जगण्यात मी खमका होतो फाईटिंग सीन साकारताना या गोष्टी त्याला जाणवल्या असं ऋषिकेश म्हणतो सध्या च्या ५ जीबी इंटरनेटच्या काळात ऋषिकेश सारखा तरुण त्याची यशाची शिखरे कष्ट करून हळूहळू गाठत आहे अंबाजोगाई पासून त्यांने सुरू केलेला प्रवास पुण्यापर्यंत आला आणि नंतर त्यांने त्याच्या अभिनयाच्या स्वप्नासाठी मुंबई ची वाट धरली आणि आज तो मुंबई -पुणे असा प्रवास करत, कष्ट करत त्याचे शिक्षण आणि आवड दोन्ही जपतो आहे हे आजच्या काळात तरूण पिढी ला 5 जीबीच्या स्पीड च उदाहरण आहे तेव्हा त्यांची नवीन मालिका “उदे ग अंबे उदे” दररोज संध्याकाळी ६ वाजता पाहिला विसरु नका…असे आवाहन दै.चालु वार्ताशी बोलताना ऋषिकेश यानी केले.