
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर (अहमदपुर):- तालुक्यातील मुख्य शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिना निमित्त क्षयरोग जनजागृती करण्यात आली आहे
तालुक्यातील नर्सिंग महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉक्टर श्री बाळासाहेब नागरगोजे (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अहमदपूर ) आणि डॉक्टर श्री एस. बी. मोरे (तालुका आरोग्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीमती मनकर्णा पाटील डॉक्टर श्री जयप्रकाश केंद्रे हे उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये अहमदपूर येथील संत तुकाराम नर्सिंग स्कूल तसेच शांति शंकर नर्सिंग स्कूल आणि नवजीवन नर्सिंग स्कूल येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री मोबीन कादरी (एस. टी. एल. एस.), श्री प्रवीण नकाते (टी.बी. एच.व्ही.) यांनी नियोजन करून कार्यक्रम संपन्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश स्वामी (समुपदेशक) यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती शुभांगी खसे (क्ष- किरण वैज्ञानिक अधिकारी) यांनी मानले.