
दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
अंबड : तहसील कार्यालय पुरवठा विभागाचे कारवाईत घरगुती वापरायचे 13 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले व अंबड तालुक्यातील हॉटेल चालक व्यवसायांवर कारवाई घरगुती वापरण्यासाठी असलेले 13 गॅस सिलिंडर अंबड तहसील कार्यालय पुरवठा विभाग येथे जप्त करण्यात आले आहे .अंबड शहरातील काही हॉटेलवर घरगुती गॅस सिलिंडर वापर करणाऱ्या 13 हॉटेल चालकावर कारवाई करण्यात आली आहे .अंबड तहसील कार्यालयाचे पुरवठा विभागाची ही कारवाई केलेल्या कारवाईत घरगुती वापरलेले 13 सिलिंडर जप्त अंबड तहसील कार्यालय पुरवठा विभाग जप्त केले व अंबड शहरातील काही हॉटेल चालक आपल्या व्यवसायासाठी व्यवसाय गॅस सिलेंडर आयोजित घरगुती गॅस सिलिंडर वापरत असल्याचे माहिती अंबड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाला मिळाली होती. त्या वरून ही आज कारवाई करण्यात आली. दि 21 शुक्रवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारे अंबड तहसील कार्यालयाचे पुरवठा विभागाने कारवाई करून 13 घरगुती वापरायचे गॅस सिलेंडर जप्त केले .याप्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयाचे घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या हॉटेल तालुकावर कारवाई संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली .या कारवाईत मध्ये .हॉटेल गौरी. हॉटेल सुखसागर. बार हॉटेल सावता. हॉटेल सम्राट .आमोसाई दाळ बट्टी. हॉटेल मोरया आदी आस्थापनेवर कारवाई करण्यात आली आहे ही. कारवाई तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पुरवठा किरणकुमार खांडेभराड. कृष्णा शिंदे .अरविंद भालेराव. आदींच्या वतीने करण्यात आली. या कारवाईने घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या व्यवसायिकाचे धाबे दणाणले आहे.