
दैनिक चालु वार्ता लोहा / प्रतिनिधी
लोहा तालुक्यात सतत शेतकरी कष्टकरी कामगार अन्याय अत्याचार मराठा आरक्षण सामाजिक क्षेत्रात सतत सहभागी होणारे युवा नेतृत्व नंदाजी पाटील इंगळे यांची युवासेना लोहा तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली.
हिंदूऱ्हदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमोद साबळे उपजिल्हाप्रमुख सचिन जारीकोटे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
शिवमुद्रा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, शालेय साहित्य वाटप, नेञ तपासणी शिबिर घेऊन सामाजिक कार्यात सतत ठसा उमटविणारे नंदाजी पाटील इंगळे हे तालुक्यातील नावलौकिक व्यक्तीमत्व असल्याने या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोविंद पाटील वडजे , शिवतेज युवा प्रतिष्ठानचे सुरज तेलंगे , रूपेश पवार विजय पा मोरे प्रताप वाडके सह आदींची उपस्थिती होती.