
दैनिक चालु वार्ता नांदेड जिल्हा प्रतिनिधी -प्रा. विजयकुमार दिग्रसकर
राष्ट्रभाषा प्रचार समिती,वर्धा यांच्या वतीने सप्टेंबर 2024 मध्ये राष्ट्रभाषा शुद्ध सुलेखन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये इयत्ता चौथी वर्गातील एकूण 25 विद्यार्थी सहभागी झाले होते.काही दिवसांपूर्वी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दिनांक 24 मार्च 2025 रोजी लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगवी,(बु.) नांदेड यांच्या वतीने राष्ट्रभाषा शुद्ध सुलेखन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ही परीक्षा हिंदी या भाषेतून घेण्यात आली.यामध्ये दोन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले तर इतर 23 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये पास झाले. सदरील प्रमाणपत्र हे नांदेड शहरातील माणिक नगर भागातील शिवाजी प्राथमिक शाळा या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यांना यावेळी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हिंदी भाषेचा अधिकाधिक प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तसेच या प्रमाणपत्राचे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नौकरीसाठी मदत होणार आहे.या कार्यक्रमाला लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगवी ( बु.), नांदेड अध्यक्ष निलेश भुक्तरे, उपाध्यक्ष राहुल ढोले,सचिव सौ.सुकेशनी सावंत,संस्थेचे सल्लागार गंगाधर पाईकराव,प्राचार्य डॉ.आबासाहेब कल्याणकर,शाळेचे शिक्षक पांडुरंग काळे,सौ.शिल्पा लुंगारे तसेच अतुल देशमाने,गोविंद पडुळकर,लोंढे यांच्यासह विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.