
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कॉमिडीयन कुणाल कामरा याने वादग्रस्त गाणे तयार केले. कॉमिडीयन कुणाल कामरा त्याच्या एका गाण्यातून अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. खार येथील युनीकॉन्टिन्टेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये एका शोमध्ये कुणाल कामरा ने हे गाणे गायले होते. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहे. याच प्रकरणाचा निषेध म्हणून पैठण शहरात खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पैठण तालुका व पैठण शहर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात तीव्र निदर्शने करत जोडे मारून कामरा याचा निषेध करण्यात आला. यावेळी तुषार पाटील, सोमनाथ परदेशी, किशोर चौधरी, शिवराज पारिख, नामदेव खरात, राजु मापारी, बाळासाहेब माने, सोमनाथ परळकर, जालिंदर आडसुळ, अजित पगारे, संजय कस्तुरे, सुनील हिंगे, शहादेव लोहारे, मनोज गायके, जनार्दन मिटकर, आबासाहेब गिरगे, भारत कासोदे, ऋषी दहिभाते, अमित गोरे, किरण घाटविसावे, विलास मोरे, मनिष ओटे, अमोल गिरगे, अक्रूर गलधर, विष्णू जगताप, योगराज बुंदिले, पदम खंदारे, विष्णू खंडागळे, सह आदिं मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.