दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी- किशोर फड
बीड/अंबाजोगाई
विद्यार्थ्यांनी पटकाविले सुवर्ण पदकासह रौप्य आणि कांस्य असे एकूण 32 पदक….
————————————-
अंबाजोगाई – नुकत्याच जाहीर झालेला महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त एमटीएस ओलंपियाड या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत जिजाऊ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.शाळेला एकुण 2 गोल्ड मेडल,16 सिल्व्हर मेडल,तर 14 ब्रांझ मेडल मिळाले आहे.
कु. मनिषा बालाजी गणेश (3 री ) हिने राज्यात 7 वी तर जिल्ह्यात 3 री येत रौप्य पदक पटकावले आहे.विद्यार्थ्यांच्या या नेत्रदिपक यशामध्ये शाळेतील शिक्षकांसह पालकांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मुख्याध्यापिका मोहिनी जाधव यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट यशाबद्दल शाळेचे संस्थापक सचिव ॲड.दयानंद लोंढाळ तसेच मुख्याध्यापिका मोहिनी जाधव व सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
