
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड देगलूर :
देगलूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडखेल येथील विद्यार्थी साईरुद्राक्ष चन्नबस मठदेवरू केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे प्रवेशाकरिता निवड झाली आहे.नांदेड जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय च्या इयत्ता सहावी वर्गासाठी जानेवारी मध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडखेल येथील विद्यार्थी साईरुद्राक्ष चन्नबस मठदेवरु याची निवड झाली आहे.
त्याच्या या यशाबद्दल समाजात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे .ग्रामीण भागातून शिक्षण घेत असताना त्यातून त्याने यश संपादन केले आहे.
त्याच्या यशाचे श्रेय त्याने आपल्या शाळेतील मुख्याध्यापक, शा. व्यवस्थापन अध्यक्ष आणि सर्व गुरुजनांना दिली आहे .
त्याच्या या यशाबद्दल शंकरप्पा मठदेवरू,गंगाधर स्वामी,
महालिंग स्वामी, शिवानंद स्वामी, प्रा.सी.एस.मठदेवरू, बस्वराज स्वामी, डॉ. राचप्पा हसगुलकर,शिवप्रसाद स्वामी, डॉ. प्रशांत स्वामी,अमोल मठदेवरू, प्रफुल्ल मठदेवरू, बसवलिंग स्वामी, डॉ. शिवकार्तिक स्वामी, डॉ. एस. शिवपूजिता आदींनी अभिनंदन केले आहे.