
दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक -अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी :- तालुक्यातील तारासावंगा येथील गैरअर्जदार धनराज राऊत याने स्वतःच्या शेतात निष्काळजीपणे लावलेल्या आगीत शेजारील शेतकरी अजय बाबाराव नरंगे यांचे शेती उपयोगी साहित्य जळून ७५ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे आष्टी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे प्राप्त माहितीनुसार, अर्जदार अजय नरंगे आणि धनराज राऊत यांचे शेत एकमेकाला लागून आहेत घटनेच्या दिवशी अर्जदार अजय नरंगे यांनी गैरअर्जदार धनराज राऊत याला सद्यस्थितीत गव्हाचा कचरा पेटवू नको माझे नुकसान होईल असे म्हणून सुद्धा धनराज राऊत यांनी स्वतःच्या शेतातील गव्हाचा कचरा जाळला आणि घरी निघून गेला त्या आगीची धग अर्जदार यांच्या शेतात येऊन शेतातील साहित्याला आग लागली त्यात पंधराशे बासे आणि ७ संत्रा झाडांना आग लागून असे एकूण ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पोलीस रिपोर्ट मध्ये म्हटले आहे या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी गैरअर्जदार धनराज राऊत याचेवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३२४(४) अंतर्गत पोलीस कारवाई केली आहे